अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन लग्न समारंभा मधून रोख रक्कम आणि दागिने चोरी करणाऱ्या सात आरोपींना मध्यप्रदेशमध्ये जाऊन जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलिसानांकडून समजलेली माहिती अशी कि शिर्डी येथे लग्न खर्चासाठी आणलेली १५ हजार रु.रक्कम असलेली बँग चोरी झालेल्याच्या शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
या माहितीनुसार अनिल कटके यांनी आरोपींना शोधण्यासाठी स्वतंत्र पथके मध्यप्रदेशात पाठवली. पोलिस पथकांनी एकूण सात जणांना ताब्यात घेतले. त्याच्या कडून ५५ हजार रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली १३ लाख रुपये किंमतीची हुंडाई कंपनीचे व्हेन्यू कार (नंबर एमपी ९ सीसीएस ७४५०) व ९ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी
कंपनीची सफेद रंगाची बलेनो कार ( नं. एमपी ९ डब्ल्यूजी ५८१३), तसेच ७८ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ६ मोबाईल असा एकूण २३ लाख ३३ हजार रुपये किमतीचे वाहने व रोख रक्कम जप्त केली. पकडण्यात आलेला सर्व आरोपींना मुद्देमालासह पुढील तपाससाठी शिर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक कारण्यात आलेल्या आरोपींचे नाव गोलू उर्फ सुमेर सिसोदिया ( वय २५), संदीप सुमेरा जोरदार झोजा उर्फ सिसोदिया ( वय १९ मूळ रा. बडा पिपलीयाॅ जि. देवास, मध्यप्रदेश ह रा. बाजारपूर जैधपुर ज्ञानमंदिर गल्ली नं. ४ मकान नं. ३८० न्यू दिल्ली),
राधेश्याम उदयराम राजपूत उर्फ ठाकूर (वय ३० रा. अलीविहार ए ३१० सरिताविहार दिल्ली), बिपीन राजपाल सिंग (वय २१ रा. लखपत कॉलनी, मिठापुर एक्टेंशन घर नं. २८९, गल्ली नं. ४ नवी दिल्ली), गिरीराज दिनेशचंद्र शुक्ला (वय २५, रा.ए ९७८ /११ जैधपूर, पार्ट-२, बदापूर नवीदिल्ली),
अनिल कमल सिसोदिया (वय ३० ह.रा. जैधपूर, ज्ञानमंदिर गल्ली नं. ४ मकान नं. ३८० नवीदिल्ली, मूळ रा. बडा पिपलियाॅ, जि. देवास, मध्यप्रदेश), विशालकुमार बनी सिंग (वय१९, रा.९८ ए, राशननगर, अगवानपूर, हरियाणा) वरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,
श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि मिथुन घुगे,
पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापु नानेकर, पोहेकाँ दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना संदीप पवार, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोकाॅ संदीप दरंदले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved