अहमदनगर ब्रेकिंग : २६ लाखांची दारू लांबवली !

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- वर्दळीच्या ठिकाणी चांदेकसारे-झगडेफाटा शिवारात २५ फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास ट्रकचालकास मारहाण करून सुमारे २६ लाख ४९ हजार ७४१ किमतीची दारू लांबवण्यात आली.

योगेश कैलास खरात (भोजडे चौकी), संतोष गौतम खरात (भोजडे चौकी), धनंजय प्रकाश काळे (रामवाडी, संवत्सर) व एक अनोळखी व्यक्तीने ट्रक अडवून चालकास बेदम मारहाण केली. ५१ हजार ५०० रुपये किमतीची भिंगरी संत्रा कंपनीचे ७५० मिलीच्या १२ बाटल्या असलेले

१०० बॉक्स, ५,५४,५०० रुपये किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे १८० मिलीच्या प्रत्येकी ४८ बाटल्या असलेले ९५० बॉक्स, १,३५,००० किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे ९० मिलीच्या प्रत्येकी १०० बाटल्या असलेले २०० बॉक्स लांबवण्यात आले.

याबाबत शरद गोपीनाथ वरगुडे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही घटना घडून आठवडा उलटल्यावर फिर्याद दाखल झाल्याने तालुक्यात उलटसुलट तर्क सुरू आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe