अहमदनगर ब्रेकिंग : हनीट्रॅपची आणखी एक घटना उघडकीस !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  नगर तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हनीट्रॅपची एक टोळी उघडकीस आणली होती.

त्यानंतर जिल्ह्यातील अकोले, संगमनेरमध्येही मागील आठवड्यात हनीट्रॅपच्या घटना घडल्या. आणि आता पुन्हा नगरमधील एका टोळीने पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

वडगाव गुप्ता परिसरात राहणार्‍या तरूणीने त्या बागायतदाराशी मैत्री करून त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागितली.

या बागायतदाराने त्या ट्रॅपवाल्या टोळीला चेकने पैसे दिले व नंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नगरमधील हनीट्रॅपची नवीन टोळी उघड झाली आहे.

पोलिसांनी त्या ट्रॅपवाल्या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 15 व 16 जून रोजी ही घटना घडली आहे.

गुन्हा दाखल झाल्यामध्ये वडगाव गुप्ता येथील तरूणी, तिचा पती व त्यांचा पाथर्डी तालुक्यातील एका पंटरचा समावेश आहे. ते सध्या पसार झाले असून एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe