अहमदनगर ब्रेकिंग : लष्करातील जवानाने लग्नाचे अमिष दाखवून केला बलात्कार ! सोशल मिडियावर अश्‍लिल व्हिडीओ व्हायरल…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   २० वर्षीय तरूणीचा गेल्या तिन वर्षांपासून पाठलाग करून, लग्नाचे आमीष दाखवून तिच्या ईच्छेविरोधात बळजबरीने बलात्कार करणाऱ्या गोरेगांव येथील अनिल गंगाधर नांगरे याच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पिडीत तरूणीने पारनेर पोलिस ठाण्यात येउन फिर्याद दाखल केली असून आरोपी अनिल याने मार्च २०१८ ते २९ जुन २०२१ पर्यंत तिच्यावर अत्याचार केल्याचे त्यात नमुद करण्यात आले आहे.

पिडीतेचा पाठलाग करून, तिच्याशी ओळख करून लग्न करण्याचे अश्‍वासन देऊन तिची ईच्छा नसताना कान्हूर रस्त्यावरील राज पॅलेस येथे घेऊन जाऊन तिच्या ईच्छेविरोधात बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

अत्याचारानंतर पिडीतेसोबत लग्नास नकार देत बदनामीकारक मजकुर विविध व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करून पिडीतेसह तिच्या घरातील सदस्यांची बदनामी केली. तुझा व्हॉटेलमध्ये काढलेला व्हिडीओ व्हायरल करतो अशी धमकीही अनिल नांगरे देत होता.

नांगरे याच्या जाचाला कंटाळून पिडितेने पारनेर पोलिस ठाण्यात येऊन त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप हे स्वतः या गुन्हयाचा तपास करीत आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहीतीनुसार आरोपी अनिल हा लष्करातील जवान आहे. वारंवार सुटी काढून तो गावी येत असे व पिडितेवर अत्याचार करीत असे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe