अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही धक्कादायक घटना रविवारी (७ मार्च) उघडकीस आली.
यासंदर्भात अकोले ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यातून पीडिता गर्भवती राहिली असताना तिचा गर्भपात घडवून आणत अर्भकाचीही विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकारानंतर पीडीतेवरील लैंगिक अत्याचार बंद ठेवले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी सोमनाथ रामभाऊ पथवे (विठे, अकोले) व त्याच्या कुटुंबातील अन्य दोघांविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने पीडितेवर विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केले. आरोपीने फेब्रुवारीत गर्दनीच्या डोंगरावर नेवून अत्याचार केले.
पीडितेने २८ फेब्रुवारीस आरोपी सोमनाथचे घर गाठले. घडलेला सर्व प्रकार पीडितेने त्याच्या घरच्यांना सांगितल्यावर त्याच्या घरच्यांनी पीडितेस धक्काबुक्की करुन तिला तेथील घरात कोंडले.
मात्र प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला. घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार आईस सांगितला. पोलिस ठाण्यात दाखल होत आरोपी सोमनाथ व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सोमनाथला अटक केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|