अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात करोना संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याच्या कारणावरून शाई फेकण्याचा प्रकार घडलेला आहे.
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आतयाची माहिती मिळाली आहे.
नेवासामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत वंचीत बहूजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला.
पंचायत समितीच्या सभागृहात चालू असलेल्या बैठकीत हा गोंधळ उडाला. तत्काळ पोलिसांनी या वेळी हस्तक्षेप केला.
नंतर संजय सुखदान यांना सविस्तर चर्चा करण्यासाठी मिटिंगमध्ये बोलावून सुखदान यांचे म्हणणे खासदार लोखंडे यांनी ऐकून घेतले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|