अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी प्रशांत काळे आज दुपारच्या दरम्यान मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी बाळासाहेब नाहाटा यांना अटक करण्यात आली आहे.
गावातील नागरिकाने केली होती तक्रार…
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणाथ ग्रामपंचायत च्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगातून अनेक कामे विनापरवाना केले असल्याची तक्रार गावातील नागरिकाने केली असता याबाबत गटविकास अधिकारी चौकशी अहवाल सादर करत असल्याची माहिती बाळासाहेब नाहटा यांना मिळाली.
नाहटा यांचा राग अनावर झाला आणि…
नाहटा यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी किरकोळ बाचाबाची केली तरीही गटविकास अधिकारी हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला आणि बाहेर निघालेल्या गटविकास अधिकारी यांच्या दिशेने नाहटा यांनी पायातील बूट फिरकवला.
नाहटा याना अटक
दरम्यान याप्रकरणी प्रशांत काळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व बाळासाहेब नाहटा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस ठाण्यात बाळासाहेब नाहटा यांच्याविरुद्ध भादवी कलम ३५३ ,१८६ ,२९२ ,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली आहे.
सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई
लोणी व्यंकणाथ ग्रामपंचायत च्या माध्यमातून 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधील रक्कम कोणत्याही कामाची परवानगी न घेता अनेकदा वापरली
मात्र याबाबत एका नागरिकाने याबाबत गटविकास अधिकारी श्रीगोंदा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
या अर्जावर कारवाई करत गटविकास अधिकारी यांनी तत्कालीन सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी अहवाल तयार करून
जिल्हा परिषद कार्यालयात कारवाई करण्यासाठी दाखल करणार असल्याची माहिती बाळासाहेब नाहटा यांना मिळाली होती
पायातील बूट गटविकास अधिकारी यांच्यावर फेकला !
नाहटा यांनी पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी यांचे कार्यालय गाठले त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी संबंधित विषयवार चर्चा करत असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली
अनेकदा समजून सांगूनही गटविकास अधिकारी ऐकत नसल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला त्यांनी पायातील बूट गटविकास अधिकारी यांच्यावर फेकला
या घटनेचा पुढील तपास उपविभागिय पोलीस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व सपोनी तेजनकर करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम