अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष व शिवव्याख्याते म्हणून परीचीत असलेले युवा कार्यकर्ते अमजदभाई पठाण (रा. नान्नज, वय ३५) यांचे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास खाजगी हॉस्पिटलमध्ये अकाली निधन झाले.
मागील चार दिवसांपासून ते आजारी होते, त्यातच त्यांची प्रकृती खालावली असल्याने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्यावर नान्नज गावी सोशल डिस्टन्सिंग पाळुन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून देखील त्यांनी गरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले होते.
अमजदभाई पठाण हे मुळचे नान्नज येथील ग्रामिण भागात रहात असुन देखील ते विविध पक्षांच्या व संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आपली जनतेशी नाळ जोडली होती.
शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून त्यांनी दोन वर्षे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. तसेच मौलाना आझाद संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले होते.
रा.कॉ.पक्षाचेही अनेक पद भूषविले होते. शिवप्रहार संघटना, संभाजी ब्रिगेडसह अनेक सामाजिक संघटनांमध्ये त्यांनी काम केले होते. विविध आंदोलनामध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग असत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|