अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी आढळला मृतदेह..!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अज्ञात व्यक्तीने टणक व कठीण हत्याराने पाठीवर, डोक्यावर व हातापायावर गंभीरपणे मारून अज्ञात व्यक्तीचा खून केल्याची घटना नगर तालुक्यातील अरणगाव- सोनेवाडी जाणाऱ्या बाजुस घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, अरणगाव ते सोनेवाडी जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रीज रोडच्या बाजूस खाली उताराला वनदास पांडुरंग पुंड यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

त्या व्यक्तीच्या पाठीवर डोक्यावर पाठीवर हातापायावर टणक व कठीण हत्याराने मारल्याच्या गंभीर जखमा असून, या मारहाणीत त्याच्या फुफ्फुसाला अंतर्गत जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्दात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि राजेंद्र सानप हे करीत आहेत.

या खून झालेल्या अज्ञात व्यक्ती ही ओळखीची असल्यास नगर तालुका पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सपोनि राजेंद्र सानप यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe