अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळील बंधाऱ्यात दोन तरुण आंघोळ करण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर एक मात्र सुदैवाने वाचला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तिसगाव व करंजी येथे मिठाईचा व्यवसाय करण्यासाठी राजस्थान येथून काही कुटुंब येथे स्थायिक झालेले आहेत.
यामधील प्रणव पांडूरंग कुचेकर (वय वर्षे 17 रा.बीड), मनेष देवराबी भाभी (बिष्णोई रा. जोधपुर राजस्थान) व लादुराव जगन्नाथ पालेवाल (रा. जोधपुर, राजस्थान) हे तिघे तरुण देवराई येथील बंधाऱ्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते.
दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी प्रणव व मनेश या दोघांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तर लादूराम मात्र सुदैवाने वाचला .
त्याने पटकन महामार्गावर उभे राहून आरडाओरड करून इतरांना मदत मागितली.आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
काहीवेळानंतर घटनास्थळी पोलीस पथक हजर झाले. त्यांनी येऊन या दोन तरुणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना केले. या तरुणांच्या मृत्यूमुळे तिसगाव करंजी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|