अहमदनगर ब्रेकिंग :ब्रेक फेल झाले अन टेम्पो घुसला बसस्थानकात एक ठार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार येथे ब्रेक फेल झाल्याने टेम्पोच्या धडकेने मोटरसायकल ठार, तर हा टेम्पो बसस्थानकात शिरल्याने बसस्थानकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा कडून नाशिक येथे जाणाऱ्या (एम.एच. १५ डीके ६३८९ ) या द्राक्षे भरलेल टेम्पोने बस स्थानक उडवले.

बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये राहुल शिवराम पवार (वय १७ वडगाव दर्या) हा जागीच ठार झाला आहे. तर या अपघातात अतुल शिवराम घुले (वय ५० पिंपळगाव रोठा) हा गंभीर जखमी झाला आहे.

प्रकाश सतीश शिंदे (वय १४) गणेश आबा रोकडे (वय २० वडगाव सावताळ) रंजना राजु पवार( वय ३८ , वासुंदे) जखमी झाले आहेत, तर चारचाकी व दुचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टेम्पोचालक अतुल प्रजापती याला पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हा टेम्पो श्रीगोंदा तालुक्यातुन द्राक्षे घेऊन नाशिक याठिकाणी चालला होता. कान्हुर पठार बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून दोन दिवसांत अतिक्रमण स्वताहून काढून घेण्यात यावी.

अन्यथा अतिक्रमण शासन पातळीवर काढणार असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सपोनि विजयकुमार बोत्रे  पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News