अहमदनगर ब्रेकिंग : पुलावरून कार खाली कोसळली आणि….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-संगमनेर तालुक्यात बोटा गावातील बाह्यवळण पुलावरून कार खाली कोसळल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पुणे नाशिक महामार्गावर बोटा गावात असलेल्या बाह्यवळण पुलावरून गाडी थेट खाली कोसळली यात गाडीचा चक्काचूर झाला असून चारजण जखमी झाले आहेत.

यातील एकाची परीस्थिती गंभीर आहे. शनिवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हि घडली आहे या भिषण अपघातात कारचा अक्षरशा चक्काचूर झालाय.

घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कार मधून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णवाहिकेतून संगमनेर आणी आळेफाटा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.

हा अपघात इतका भिषण होता की कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे .या कारमध्ये दोन तरूण आणी दोन तरूणी असल्याची माहिती आहे.. हे सर्वजण कुठे राहणारे आहेत याबद्दल माहीती मिळाली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!