अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तोंडी शिक्षकांविषयी अनुदार उद्गार घालून खोटी बातमी देणार्या औरंगाबाद येथील लोकपत्र चा संपादक रविंद्र तहकिक याच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड विधान चे कलम १५३ अ (१)(ब)(क) तसेच ५०४, ५०४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कलमांतर्गत आरोपीला ३ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. निराधार वृत्त छापून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी करणे,
शिक्षक वर्गाला ज्येष्ठ समाजसेवकाच्या विरोधात चिथावणी देणे आणि शिक्षक वर्ग व अण्णा समर्थक अशा दोन समुदायात तेढ निर्माण होईल असे कृत्य करून सामाजिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













