अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे नवसारवाडी येथील अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. यातून मुलगी गर्भवती राहिली.
गर्भवती राहिलेल्या मुलीचे शिरूर येथील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला. याप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर श्रीगोंदे कोर्टाच्या आदेशावरून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला आरोपी करण्यात आले.
कर्जत शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत नवसारवाडी येथील एका तरुणाने प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर अल्पवयीन प्रेमयुगलाने पळ काढला. याबाबत संबंधित मुलांमुलीच्या नातेवाईकानी कर्जत पोलिसात १६ फेब्रुवारी २०२० रोजी तक्रार दाखल केली.
दरम्यानच्या कालावधीत प्रेमी युगलाने शिरूर या ठिकाणी वास्तव्य केले. मुलीचे वय १४ वर्ष ७ महिने, तर मुलाचे १७ वर्षे ६ महिने आहे. दोघांच्या संबंधताून मुलगी गर्भवती राहिली. त्यांनी शिरूर येथील चोरे हस्पिटल येथे उपचारासाठी गेले.
डॉ मनीषा चोरे यांनी त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. आरोपीने अल्पवयीन असल्याने १८ वर्षे पूर्ण झाल्याचे बनावट आधार कार्ड बनवले. सोनोग्राफी करून त्याचा रिपोट पुन्हा डॉ. चोरे याना दाखवला.
त्यावेळी त्या दोघांनी डॉ. चोरे यांना आम्हाला बाळ नको, आम्हाला गर्भपात करायचा असे सांगितले. त्यानुसार गर्भपात करण्यात आला. कर्जत पोलिसांना हे प्रेमीयुगल शिरूर या ठिकाणी वास्तव्य करत असल्याचे समजले.
त्यानुसार पोलिसांनी त्यांना शिरूर या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यावेळी मुलीने तिच्या नातेवाईकांना झालेली हकीगत सांगितली. त्यानुसार शिरूर या ठिकाणी आश्रय देणारा व मुख्य आरोपी
यांच्यावर भादंविच्या ३७६ तसेच बालकांचे लैंगिक शोषण अपराधापासून बचाव कायद्यानुसार कर्जत पोलिस ठाण्यात ७ जानेवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी श्रीगोंदे जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशानुसार तपासी अधिकारी उपनिरीक्षक अमरसिंह मोरे, पोलिस निरीक्षक यांनी न्यायालयात माफीनामा दिला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव न्यायालयात हजर झाले.
न्यायालयाने गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला यामध्ये आरोपी का केले नाही म्हणून पोलिस अधीक्षक यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम