अहमदनगर ब्रेकिंग : दिराने केला भाऊजईचा खून ! दोघे ताब्यात

Published on -

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. जामखेड तालुक्यातील साकत येथे सीमा घोडेस्वार या महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती बाळू अरूण घोडेस्वार व दीर अतुल अरुण घोडेस्वार या दोघांना ताब्यात घेतले आहे.

घरात किराणामाल आणण्यासाठी सीमा हिने तिच्या पतीच्या खिशातून काही पैसे काढले. यावेळी तिची पतीसोबत झटापट झाली. पतीने तिला शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी सीमानेही पतीच्या तोंडात चापट मारली. याचा तिच्या दिरास राग आला.

त्याने सील हिला शिवीगाळ करत ढपलीने डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी सीमाला जामखेड येथे दवाखान्यात नेले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राजेंद्र आश्रुबा सरोदे (वय ५९ रा. पारगाव घुमरा, ता. पाटोदा जि. बीड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटलं आहे की, माझी मुलगी सीमाचे पंधरा वर्षांपूर्वी जामखेड तालुक्यातील साकत येथील बाळू अरूण घोडेस्वार याच्याशी लग्न झाले होते.

जावाई बाळू यास दारूचे व्यसन आहे. गेल्या सात आठ वर्षापासून पती व दिर हे दोघे सीमास माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करत होते. दि. ८ रोजी रात्री माझी नात दिक्षा हिचा फोन आला व रडायला सुरूवात केली. ति

ने सांगितले की, अंकलने मम्मीला खूप मारले. ती बेशुद्ध पडली आहे. त्या फोन नंतर आम्ही तातडीने साकत येथे आलो. आम्ही ताबडतोब जामखेड येथील हॉस्पिटलमध्ये आलो. तेथून तिला सरकारी दवाखान्यात आणले तेव्हा डॉक्टरांनी सीमाला मृत घोषित केले असे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती समजताच जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पो.ना.कोपनर, पो.काँ.प्रवीण इंगळे, पो.कॉ.प्रकाश मांडगे, पो.कॉ.कुलदीप घोळवे, पो.कॉ.पळसे, पो.कॉ.देशमाने, पो.कॉ.नवनाथ शेकडे, पो.ना.जितेंद्र सरोदे या पथकाने काही तासातच तातडीने कारवाई केली. आरोपी अतुल अरूण घोडेस्वार व बाळू अरूण घोडेस्वार यांना ताब्यात घेतले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!