अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे.
कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. एकही दिवस वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे.
नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षातील परीक्षेसाठी ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. पैकी ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
म्हणजे १९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे दिसते आहे. मागील वर्षी मार्च २०२० नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला होता. दोन्ही वेबसाईट तब्बल सव्वा तास डाऊन ! दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल सव्वा तास डाऊन झाल्या आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे.
वेबसाईट डाऊन का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राज्यात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली. निकालात मुलींची बाजी दरवर्षी प्रमाणं यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के तर मुलींचा निकाल 99.96 टक्के लागला आहे. 12 384 शाळांचा निकाल 100% लागला आहे. तर, 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम