अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावत कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी केली.याबाबत सोशल मीडियावरही या पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे आयुक्त गोरे यांनी तातडीने दखल घेत शनिवारी कारवाईची नोटीस बजावली आहे.
स्वत:च्या वाढदिवसाचं औचित्य साधून मित्रांची गर्दी जमवत त्याचप्रमाणं कोरोनाचे नियम पायदळी तुडवत ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हे गाणं गायलेल्या महापालिका आरोग्याधिकारी डाॅ. अनिल बोरगे यांना आयुक्त शंकर गोरे यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवलीय.

डाॅ. बोरगे यांना जबाबदारीचं भान नसल्यानंच हा प्रकार घडल्याचं मत नोंदवत आयुक्त गोरे यांनी डाॅ. बोरगेंचे कान उपटले आहेत.आपलं म्हणजे डाॅ. बोरगेंचं वर्तन वरिष्ठांचा अवमान करणारं आणि महानगरपालिकेची प्रतिमा मलिन करणारं आहे, असं मतही आयुक्त गोरे यांनी या नोटिशीत व्यक्त केलंय.
डाॅ. बोरगेंच्या वाढदिवसाची बातमी आणि त्यांनी गायिलेल्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’, या गाण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि डाॅ. बोरगेंना अनेक सोशल मिडिया युजर्सनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं.
या सर्व वस्तुस्थितीची गांभिर्यानं दखल घेत आयुक्त गोरे यांनी आरोग्याधिकारी डाॅ. बोरगेंना कारणे दाखवा नोटीस पाठवली. आता या नोटिशीला डाॅ. बोरगे नेमकं काय उत्तर देतात आणि आयुक्त गोरे डाॅ. बोरगेंविरुध्द काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होणारे अधिकारी, कर्मचारी सतीश मधुकर मिसाळ, भाऊसाहेब बबनराव सुडके, विकास भानुदास गिते, महंमद जावेद गुलमोहंमद रंगरेज, किरण बलभीम खरात, धोडींबा देवजी भाकरे यांनाही ही नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्टीत सहभागी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मात्र सूट देण्यात आल्याचे दिसते आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम