अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- आपल्याला रोग झाले आहे आपण जगून तरी काय उपयोग असे म्हणत एका वृद्ध दाम्पत्यांनी एकमेकांच्या हातावर वार करून नस कापून टाकण्याचा धक्कादायक प्रकार आज भिंगार येथील द्वारका परिसरामध्ये घडला असून या प्रकरणांमध्ये संबंधित वृद्ध हा मयत झाला असून त्याची पत्नी सध्या उपचार घेत आहे
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत उशन्ना रामन्ना वरगंठे ( वय 78 ) हे मयत झाले आहे तर त्यांची पत्नी शकुंतला (वय 69 वर्ष) यांच्यावर उपचार सुरू आहे.
माहिती अशी की येथील द्वारका परिसरामध्ये हे जोडपं गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे. त्यांना दोन मुले असून एक मुलगा सावेडी परिसरामध्ये राहत असून एक मुलगा पुणे येथे राहत आहे. उशना वरगुंठे हे कॅन्सरने आजारी होते तर त्यांची पत्नी शकुंतला हिला हृदयविकाराचा तसेच अन्य आजार सुद्धा होता.
गेल्या काही वर्षापासून ते दोघेही उपचार घेत होते. आपल्याला रोगराई झालेली आहे, आपल्याला दोघांना जगून काय उपयोग असे म्हणत संबंधित पुरुषाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्याने त्याच्या आजाराची सर्व माहिती देऊन आपण जीवनाला कंटाळलो आहे असे म्हणत त्या वृद्धाने आपल्या पत्नीच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले
व त्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर वार करून ते दोघेही घरातच कोसळले. आजूबाजूच्या लोकांना याची माहिती मिळाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख हे पथकासह त्याठिकाणी दाखल झाले व त्यांनी यांना जिल्ह्यात शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता यामध्ये उशना वरगुंठे हे मयत झाले तर त्यांची पत्नी शकुंतला यावर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम