अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील अविनाश रावसाहेब घोलप यांच्या शेतामध्ये काल पहाटे दीड वर्षे वयाचा मादी बिबट्या जेरबंद झाला.

बिबट्याचा आवाज आल्यावर अविनाश घोलप यांनी वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व नगरचे सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी रमेश देवखिळे, वनपरिक्षेत्र अधिकारी तेलोरे,

वनपाल बी. एस. गाढे यांना माहिती दिली. गेल्या आठ दिवसांपासून या बिबट्याने परीसरात धुमाकूळ घातला होता. दोन शेळ्या व अनेक पाळीव कुत्रे यांचा फडशा पाडला होता. रविवारी संजय एकनाथ घोलप यांची शेळी ठार केली होती व सोमवारी विमल रावसाहेब घोलप यांची शेळी ठार केली होती.

काल सोमवारी सायंकाळी घोलप यांच्या गोठ्याजवळ आला. त्यांनी तातडीने म्हस्के यांना फोन करून पिंजऱ्याची मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत पिंजऱ्याची उपलब्धता करून दिली व पहाटे बिबट्या जेरबंद झाला. वनरक्षक सुरासे, म्हस्के यांनी बिबट्यास शासकीय रोपवाटिकेत रवानगी केली.

लोणीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी त्याची पहाणी केली. गर्दी होऊ नये म्हणुन सरपंच उमेश घोलप, भास्करराव घोलप, चंद्रकांत घोलप, रावसाहेब घोलप, संजय घोलप, दिपक घोलप, वनरक्षक सुरासे यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गर्दी पांगविण्यासाठी मदत केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News