अहमदनगर ब्रेकिंग : फायनान्सचे ऑफिस फोडले; इतक्या लाखाची रोकड लंपास !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील घरफोड्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. दिवसभरात जिल्ह्यातील कोणत्या तरी भागात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना सतत चालूच आहेत.

नुकतीच फायनान्स कंपनीचे ऑफिचे फोडून तब्बल १ लाख ३५ हजार ६११ रूपयांची रोख रक्कम, चेक व मोबाईल असा ऐवज लंपास केला. ही घटना शेवगावातील खंडोबा नगर परिसरात घडली आहे.

याबाबत सविस्तर असे की, शेवगावात भारत फायनान्स इनक्लोजिंग इंडोसल बँकेची खंडोबानगर परिसरात शाखा आहे.दि.१२रोजी अज्ञात चोरट्याने ऑफिसच्या टेसेवर असलेला दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला.

त्यानंतर ऑफिसमध्ये घुसून गोदरेज कंपनीच्या लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ३५ हजार ६११ रूपये रोख, महत्वाचे चेक व मोबाईल असा ऐवज लंपास केला.

या घटनेबाबत माहिती मिळताच शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे व पोलिस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.

याबाबत राजू भिवा पैठणे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाकरे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News