अहमदनगर ब्रेकिंग : अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘अनलॉकची’ घोषणा केली !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे, कारण अखेर अहमदनगर जिल्हा अनलॉक होणार आहे.

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्य सरकारने घोषित केलेल्या पहिल्या टप्प्यात सुरू होणारे व्यवहार सुरळीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी करोना नियम पाळावे असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

जर पुन्हा करोना रुग्ण आढळून आल्यास आठ दिवसांनी आढावा घेऊन निर्बंध कडक केली जातील असेही पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe