अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आज या वर्षातली सर्वात मोठी रुग्ण वाढ झाली आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. वारंवार आवाहन करुन देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा कायम आहे.
गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 1338 रुग्ण वाढले आहेत. ह्या वर्षातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक कायम असल्याचे आजही समोर आले आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर आगामी होळी, धूलिवंदन, रंगपंचमी सणावेळी गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत.
दि.२८ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कोणतेही धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाही.
खाजगी अथवा सार्वजनिक मोकळ्या जागा, सभागृह, हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी गर्दी जमवल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या आदेशात देण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|