अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू ! नऊ वर्षाचा मुलगा….

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-  अहमदनगरमधील विळद घाट येथे आज दुपारच्या सुमारास कंटेनरने चार चाकी वॅगन आर या गाडीला जोरदार धडक दिल्यामुळे या गाडीतील दोन जण जागीच ठार झाले.

या अपघातामध्ये चार चारचाकी गाडीचा चक्काचूर झालेला आहे. अपघातानंतर नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

दरम्यान या अपघातामध्ये पाटील यांचा मुलगा नऊ वर्षाचा तो वाचला आहे.या अपघातात रवींद्र किसन पाटील वय 45 व मनीषा रवींद्र पाटील 42 दोघही राहणार पाचोरा जिल्हा जळगाव मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि नगर-मनमाड महामार्गावरील आज दुपारी तीनच्या सुमाराला जळगाव येथून पाटील कुटुंब हे पुण्याकडे जात होत समोरून मोठा कंटेनर येत होता .बहुतेक कंटेनरचा तोल सुटल्यामुळे तो पाटील यांच्या गाडीवर जाऊन आदळला या अपघातामध्ये पाटील कुटुंबीय जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती विळद येथील ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

जिल्हा रुग्णालयांमध्ये या दोन्ही व्यक्तीला नेल्यानंतर त्यांना या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले या अपघातामध्ये पाटील यांचा नऊ वर्षाचा मुलगा ऋषिकेश हा या अपघातातून वाचला आहे.

एमआयडीसीच्या पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांनी व त्यांच्या पथकाने या मुलाला सुखरूप बाहेर काढले ग्रामस्थांची सुद्धा मदत त्यांना या वेळी झाली या अपघातात मुलाच्या डोक्याला जखम झाली असून त्याला येथील डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून

त्यांच्यावर उपचार सुरू आहे.अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक हा फरार झालेला आहे तर त्याचा साथीदार हा या अपघातामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe