अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- अलीकडे जमिनीवरून दोन भावांत, भावकीत मोठ्या प्रमाणात वाद होण्याची प्रकरणे वाढली आहेत.
अनेकवेळा हे वाद टोकाला जावून मारहाण, खून यासारखे गंभीर गुन्हे देखील घडतात. मात्र येथे जमीन वहीवाटीस आडव्या येणाऱ्या पतीला चक्क पत्नीनेच दोन मुली व एक जावयाच्या मदतीने झाडाला बांधुन काठीने व दगडाने बेदम मारहाण करून
जिवे मारल्याची अत्यंत गंभीर घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकजणास अटक केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील या मृत व्यक्तीला पत्नी, एक मुलगा व तिन मुली असा परिवार असून मुलगा भोळसर आहे. दहा वर्षापूर्वी पत्नीने पतीला फसवुन जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतली. तेव्हापासुन हे दोघे वेगळे राहत होते.
मात्र जमीन वहीवाट करण्यास पतीने विरोध केल्याने ती जमीन पडीक होती. सोमवारी सायंकाळी मृत व्यक्तीचे मेहूणे त्यांच्या घरी गेले असता त्याला व्यक्तीला झाडाला बांधून पत्नी दोन्ही मुली व जावई असे चौघेजण काठीने व दगडाने मारहाण करत असल्याचे दिसले
त्यांनी विरोध केल्याने त्यांना या सर्वांनी तेथून निघून जाण्याचे सांगितले. दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत संबंधित इसम बेशुद्ध पडला होता.
पोलिसांनी त्यास रुग्णालयात दाखल केेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. मात्र पत्नीनेच आपल्या पतीचा केवळ जमीनीसाठी खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम