अहमदनगर ब्रेकिंग : सिव्हील हॉस्पिटलमध्ये आता ‘यास’ बंदी ! वाचा काय संगीतलेय पोलीस अधीक्षकांनी आदेशात?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दररोज चार हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे सिव्हील हॉस्पिटल येथेच असल्याने हे हॉस्पिटल कोवीड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. जिल्हाभरातून कोवीड पॉझिटिव्ह पेशंट येथे उपचारासाठी अ‍ॅडमीट आहेत.

रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही येतात. त्यांच्या गाड्या हॉस्पिटलच्या आवारात पार्किंग केल्या जातात. सिव्हील सर्जन डॉ. पोखरणा यांनी या गाड्या बाहेर काढण्याची सूचना पोलिसांना केली.

त्यानंतर सिव्हील सर्जन, एसपी व कलेक्टरांची बैठक झाली. या बैठकीत गाड्यांना आवारात बंदीसोबतच अनेक निर्णय घेण्यात आले. तसे आदेशच एसपी पाटील यांनी काढले आहेत.

आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता सिव्हीलच्या गेटवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेट बॅरीकट लावून बंद करण्यात आले आहे.

येथे असणाऱ्या रुग्णांना नातेवाईक घरच्या जेवणाचा डब्बा देतात. मात्र त्यातून करोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका लक्षात घेता रुग्णांना घरचा डब्बा देण्यासही मनाई करण्यात आली आहे.

रुग्णांसाठी सकस भोजन देण्याचे निर्देश कलेक्टरांनी दिले आहेत. रुग्णांना सकस जेवण मिळत असल्याने नातेवाईकांनी घरचा डब्बा देवू नये असे आदेशात म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News