अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- संगमनेर येथील महसूलचे अधिकारी व कर्मचारी कोरोना बंदमध्ये शासकीय इमारतीत दारू व मटनची पार्टी करतानाचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आठ दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.या पार्टीची शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे पुराव्यासह आठ दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती.
तर खासदार सदाशिव लोखंडे यांना देखील हे प्रकरण सांगण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना या घटनेची माहिती दिली. तरी देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शुक्रवारी दिवसभर या घटनेने चर्चा सुरू होती.
ही घटना निंदनीय असल्याने या तिघांना बडतर्फ करावे. कारवाई न झाल्यास या घटनेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील तक्रार वरिष्ठांकडे दाखल होणार असल्याची चर्चा आहे. काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम