अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-बेलापूर खूर्द येथील शेतकरी पंढरीनाथ श्रीपती महाडीक, वय ५७ यांच्यावर बिबट्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. त्यात ते जखमी झाले.
यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकरी महाडीक, वय ५७ वर्ष हे रात्रीची वीज असल्यामुळे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. रात्री दोनच्या सुमारास त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. पंढरीनाथ यांच्या हातात काठी होती.

काठीच्या सहाय्याने पंढरीनाथ यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या हाताला चावा घेतला, पोटालाही पंजाच्या नखांचे ओरखडे बसले, तर पायालाही जखमा झाल्या. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर त्यांच्या घरचे लोक पळत आल्यामुळे बिबट्या माघारी फिरला.
घासातच दोन बिबटे दबा धरुन बसले होते. परंतु ते महाडीक यांच्या लक्षात आले नाही. जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी नेले. सकाळी त्यांनी बेलापूर खूर्दचे प्रा.अशोक बडधे व पोलिस पाटील जोशी यांना कळवले. त्यांनी महाडीक यांना बेलापूूर प्राथमिक केंद्र येथे आणले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर महाडीक यांना अहमदनगर येथील सिव्हील हाॅस्पिटल येथे पाठवले. या परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी बेलापुर खूर्द येथील नागरीकांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













