अहमदनगर ब्रेकिंग : काडीपेटी न दिल्याने तरुणाचा खून! ‘या’ ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  अलीकडे खून, दरोडे यासारख्या घटना वाढत आहेत. दरम्यान केवळ कडीपेटी मागितली व ती हातात न दिल्याने एकावर सशस्त्र हल्ला करत जीवे ठार मारल्याची घटना घडली.

राजू आंतवन धीवर असे मृत तरुणाचे नाव असून तो साईबाबा संस्थानमध्ये काम करत होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, साकुरी शिर्डी शहरातील नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल निसर्गाच्या समोरील पटांगणात

राजू आंतवन धीवर याला सायं.७ वाजेच्या सुमारास मोटरसायकलने आलेल्या चार अज्ञातांनी माचीस मागत हातात माचिस दिली नाही म्हणून राजू धीवर याच्यावर सशस्त्र हल्ला करत गंभीर जखमी करून पसार झाले.

राजू याला साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री उशिरा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे.

संजय पवार याच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आला आहे.

अश्या पद्धतीने गुन्हेगारांची वर्दळीच्या ठिकाणी हत्या करण्याची हिम्मत पहाता गुन्हेगारांचे धाडस पहाता पोलिसांनी कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे. याबाबत अधिक तपास शिर्डी पोलिस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe