अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- आपल्या आईचे परपुरूषाशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून मुलाने आईच्या प्रियकराचा गळा दाबून खून केला. ही घटना तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे शनिवारी रात्री घडली.
या घटनेनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून अंत्यविधीची तयारी करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालातून खरा प्रकार समोर आल्याने राहुरी पोलिसात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
चांगदेव शंकर टिळेकर असे मृताचे नाव आहे. या घटनेतील आरोपी ऋषिकेश सतीश टिळेकर (कोल्हार खुर्द) याच्या आईचे मृत चांगदेव टिळेकर यांच्या सोबत अनैतिक संबंध होते.
हे ऋषिकेश याला खटकत होते. २४ जुलै रोजी रात्री आठ वाजे दरम्यान ऋषिकेश याने चांगदेव यांचा गळा दाबून खून केला. घटनेनंतर त्याने नातेवाईकांना फोन करून चांगदेव यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते मृत झाल्याचे सांगितले.
ऋषिकेश हा अंत्यविधीची घाई करत असल्याने मृत चांगदेव यांची मुलगी रूपाली बनकर यांना संशय आल्याने त्यांनी चांगदेव यांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.
लोणी येथील रूग्णालयातून शवविच्छेदनाचा अहवाल अाल्यानंतर चांगदेव यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे समोर आले. रूपाली बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात ऋषिकेश याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीस ताब्यात घेतले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम