अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची आज दुपारी निवड झाली आहे.
आज गुरुवार दि. 4 मार्च रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
या पदासाठी अविनाश घुले व सेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी अर्ज दाखल केले होते. सेनेचे पठारे यांनी त्यांचा अर्ज माघारी घेतला. त्यानंतर घुले यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
- किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|