अहमदनगर ब्रेकिंग : पारनेरच्या पवारचा श्रीगोंद्यात मृतदेह आढळला ! गोळ्या झाडून हत्या ?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातल्या ५२ वर्षीय पांडुरंग जयवंत पवार यांचा मृतदेह श्रीगोंदा तालुक्यातल्या देवदैठण परिसरात असलेल्या बेलवंडी -शिरूर रस्त्यालगत कुकडी बसथांब्याजवळ आढळून आला आहे. 

दरम्यान, मयत पवार यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी पिंपळनेरच्या तिघांना संशयावरुन ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

खून करण्यात आला असून हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह शनिवारी रात्री देवदैठण गावाजवळ तेथे टाकण्यात आला, संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

मयत पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांचा मुलगा सागर पवार याला पटली आहे. रविवारी (दि. ११) सकाळच्या वेळी राजेंद्र जयवंत कौठाळे, अमोल कौठाळे यांनी मयत पवार यांचा मृतदेह पाहिला.

नंतर त्यांनी बेलवंडी पोलीसांना संपर्क केला. मयत पवार यांच्या कपाळावरुन पाठीमागे आरपार जाणारी मोठी जखम आढळून आली.

गोळीबार करुन खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र हा खून कोणी, कशासाठी, कशाने कधी आणि कुठे केला, या प्रश्नांची उत्तरं आरोपी जेरबंद केल्यानंतरच समजणार आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, कर्जतचे पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे,

सहाय्यक फौजदार मधुकर सुरवसे, पोलीस हवलदार मारुती कोळपे, रावसाहेब शिंदे, नंदकुमार नाईक , हसन शेख, ज्ञानेश्वर पठारे, सतीश शिंदे, कैलास शिपनकर हे घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News