अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पत्रकार हत्ये प्रकरणात आता थेट प्राजक्त तनपुरे यांचे नाव !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर हे १८ एकर भूखंड प्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.

या भूखंडातून त्यांची हत्या झाली आहे. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा व मेव्हणा यांचा या भूखंडात मालकी असून त्यांचाच या प्रकरणात हात आहे.

त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे.

याबाबत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये ही मागणी केली आहे.

या निवेदनात कर्डिले यांनी म्हटले आहे की, राहुरी शहरातील मोक्‍याच्या भूखंडांवर पहिले आरक्षण टाकून त्यानंतर त्या मालकी संपर्क करून जागेचा व्यवहार करायचा व आरक्षण उठवायचे, असा काही सत्ताधाऱ्यांचा धंदा झाला आहे.

राहुरी नगरपालिकेने या मोक्‍याच्या १८ एकर जागेवर शैक्षणिक आरक्षण टाकले होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा व मेहुणा यांचीही या जागेत मालकी आहे.

या जागेपैकी मालक असलेले पठारे यांनी पॉवर प्रॅटर्नी करून पत्रकार दातीर यांना कायदेशीर लढण्याचा अधिकार दिला होता.

दातीर यांनी या जागेबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. कान्हू मोरे याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या.

परंतु त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांनी हत्या6 करण्यापर्यंत मजल गेली आहे.

या गुन्ह्यातील आरोपींच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासल्यानंतर यातील बरेच सत्य बाहेर येणार आहे. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे,असे कर्डिले यांनी पत्रकारांना सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe