अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्यांमध्ये राडा ! भाऊ कोरेगावकरांसह नगरसेवकांना धक्काबुक्की व मारहाण…..

Published on -

आजचा दिवस अहमदनगर शिवसेना पक्ष ,नेते ,कार्यकर्ते या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा होता कारण आज अखेर अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना पक्षातील व्यक्ती महापौर पदावर बसला.

मात्र पक्षातील असंतुष्ट नेते व कार्यकर्ते यांच्यामुळे पहिल्याच दिवशी गालबोट लागले आहे.

आताच हाती आलेल्या वुत्तानुसार अहमदनगर शिवसेना नेत्यांत राडा झाला असुन वादाचे मुख्य कारण आर्थिक देवाणघेवाण असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना नगरसेविकेचे पती भाकरे यांना देखील जमवाकडून मारहाण करण्यात आली असून सेनेच्या माजी शहर प्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे यांना देखील मारहाण झाली.

नगरसेवक अनिल शिंदे आणि भाकरे या दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यातून पुढे मोठा राडा झाल्याची चर्चा आहे.

शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना देखील जमवाकडून धक्काबुक्की करण्यात आली.

फ्री स्टाईल झालेल्या या मारहाणीत थेट गावठी कट्टे आणि सत्तूर देखील आणले गेले.हा वाद नंतर थेट कोतवाली पोलीस ठाण्यात गेला असून भाकरे हे फिर्याद देण्यावर ठाम आहेत.

(ही बातमी आताच ब्रेक झाली आहे सविस्तर अपडेट थोड्यावेळानंतर / सकाळी होइल)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe