अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- गाळा बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्या मागे पाच हजार याप्रमाणे 12 गळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल,
असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधवसह सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यामध्ये जाधवसह त्याचा भाऊ राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतिक बोडखे यांचा समावेश आहे.
12 ते 15 जुलै दरम्यान ही घटना घडली आहे.याप्रकरणी विजय रमेश सामलेटी (रा. तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे.
विजय सामलेटी यांच्यासह श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे इतर लोक दिल्ली दरवाजा येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते.
गाळ्याची देखरेख करत असताना गिरीश जाधवसह त्याचे इतर भाऊ व साथीदार त्याठिकाणी आले. यावेळी ते श्रीपाद छिंदम यांना म्हणाले, हे गाळे तुम्ही येथे कसे उभे केले, तु मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही.
तुला काही बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे 12 गाळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल.
माझ्यावतीने आमचा कोणीही माणूस येईल आणि हप्ता घेऊन जाईल. त्याची पूर्तता अगोदरच करून ठेवायची, असा दम दिला.
मी सांगितलेला सल्ला ऐकणार नसाल तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझा कायमचा बंदोबस्त करू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













