अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु. १७ वर्षीय येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात नवनाथ श्रावण शाख याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कॉन्स्टेबल प्रकाश बबन कुंढारे यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यात म्हटले आहे की, २०१८ त २०२१ आज पावेतो न्यु इंग्लिश स्कुल चांदेकसारे ते लोणी आहेर वस्ती दरम्यान आरोपीने आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले.
तिच्याशी बळजबरीने २३ मे २०१९ रोजी आहेर वस्तीवर लग्न करुन शारीरीक संबंध ठेवल्याने ती आठ महिन्याची गरोदर राहिली. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय नासिक येथे उपचार चालू आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved