अहमदनगर ब्रेकिंग : शस्त्रांचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी केली लुट !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चोऱ्या, लुटमारी, दरोडे आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे .

यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नुकतेच काही दरोडेखोरांनी एका पेट्रोल पंपावर लुटमारी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील सोलापूर रोडवर दहिगाव साकत शिवारात केतन पेट्रोल पंपावर सहा ते सात दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार केली.

दरोडेखोरांच्या हल्ल्यात पंपावरील दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान आज पहाटे ही घटना घडली. पेट्रोल पंपावरील सुमारे दोन लाखांची रक्कम चोरून नेली आहे.

घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe