अहमदनगर ब्रेकिंग : सराफाच्या घरावर दरोडा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या सराफाचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सर्व साहित्याची उचकापाचक करून घरात ठेवलेली तब्बल १५ चांदी व ८ ग्रॅम सोने व २० हजार रूपये ५०० रूपये रोख रक्कम, असा एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना केडगावमधील अयोध्यानगरी येथे घडली आहे.

हा प्रकार रविवार दि.१४ रोजी उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर असे की, केडगाव येथील अयोध्यनगरीत राहणारे सराफ व्यावसायिक सचिन भास्कर दीक्षित दि.३ फेब्रुवारीला कुटूंबासह बाहेरगावी गेले होते.

दरम्यान दि.३ ते दि.१४ फेब्रुवारी या दरम्यान त्यांचे घर बंद होते. दिक्षित राहत असलेल्या आयोध्यानगरीमधील घरात सोने, चांदी, रोख रक्कम होती. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरात उचकापाचक केली.

यात चोरट्यांच्या हाती चांदी व रोख रक्कम लागली. चोरटे ते घेऊन पसार झाले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यात चोरट्यांनी डल्ला मारत १५ किलो चांदी,

८ ग्रॅम सोने व २० हजार ५०० रूपये रोख असा २ लाख ५४ हजार ७०० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. लिंक रोडवरील आयोध्यानगरीमध्ये ३ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली असून काल (रविवार) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी सचिन भास्कर दिक्षित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News