अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- नेवासे तालुक्यात दरोडेखोरांनी ‘कोरोना’ झाल्याची भीती दाखवत तब्बल एक लाखाचा ऐवज लांबविला असल्याची माहिती समोर आली आहे. .
हा प्रकार सोमवारी पहाटेच्या सुमारास घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि नेवासे तालुक्यातील सोनईच्या दत्तनगर भागातील मारुती मंदिरासमोर राहत असलेल्या संतोष कर्डिले यांच्या घराचा बाहेरील दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले.
त्यांच्या हातात कोयता, लोखंडी गज व कमरेला तलवारी होत्या. कर्डिले यांनी, कोण आहे, अशी विचारणा केली असता त्यांनी, कोरोना आहे, लांबच थांबा, असे उत्तर दिले. नंतर चोरट्यांनी घरातील महिलांच्या गळ्यांतील तीन तोळ्यांचे दागिने लांबविले.
कर्डिले यांच्या घराजवळच राहत असलेल्या दीपक जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी कपाटातील तीन तोळे दागिने व तीन हजार रुपये चोरून नेले. चोरी करण्यापूर्वी शेजारील घरांच्या कड्या बाहेरून लावल्या होत्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम