अहमदनगर ब्रेकिंग : शॉर्टसर्किटने हॉटेलधील साडेतीन लाखांचे साहित्य खाक !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोरोनामळे सध्या सर्व हॉटेल व्यवसाय बंद आहेत. या दरम्यान शार्टसर्किट होवून आग लागल्याने हॉटेलमधील तब्बल साडेतीन लाखांचे साहित्य खाक झाले.

ही घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये घडली. याबाबत सविस्तर असे की,

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यासह राज्यात देखील लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच व्यवसाय ठप्प आहेत.

या दरम्यान  शेवगाव तालुक्यातील  बोधेगाव जवळच शेवगाव-गेवराई महामार्गावर हॉटेल पुजा परमिट रूम या नावाने हॉटेल असून लॉकडाऊन असल्याने हे हॉटेल बंद होते.

या हॉटेलमध्ये मध्यरात्री अचानक शार्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत  हॉटेल मधील फ्रीज, गॅस शेगडी, किराणा माल, भांडी, प्लास्टिकच्या खुर्च्या इतर साहित्य, टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे, मिक्सर,

वायरिंग, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाक गृहामधील आदी साहित्यासह सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे आगीत जळून खाक झाले. याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News