अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका 23 वर्षीय तरूणाची कब्रस्तानमध्ये नेऊन निर्घृण हत्या करण्यात आली.
विकास देवीचंद चव्हाण (वय २३, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास समोर आली आहे.
विशेष म्हणजे आज आठ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचा हात कोपऱ्यापासून तोडण्यात आला आहे.
विकास चव्हाण याचा कोणाशी वाद होता का? अथवा लुटमारीतून विकासचा खून झाला का? याचा सिटी चौक पोलीस शोध घेत आहे.
विशेष म्हणजे एवढा निर्घृण पणे हा खून करण्यात आला असल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर येऊन ठाकले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|