अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- माजी खासदार स्वर्गीय सूर्यभान पाटील वहाडणे यांचे कट्टर समर्थक तथा भाजपाचे अत्यंत निष्ठावान कोपरगाव शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे ( वय ७५ ) यांनी मंगळवारी (दि.२७) सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, दोन नातवंडे असा परिवार आहे. प्रा. शिंदे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याप्रकरणी त्यांनी सून वर्षा शिंदे यांच्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान प्रा. शिंदे यांच्या खिश्यात एक चिट्ठी सापडली आहे. त्यामध्ये नेमके काय लिहिले आहे, या संदर्भात पोलिसांनी माहिती देण्यास टाळले असून त्यानुसारच पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले आहे.
प्रा. शिंदे यांचे राज्यभरातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी व्यक्तिश: जवळचे संबंध होते. त्यांच्या आत्महतेमुळे भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|