अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- नेवासे तालुक्यातील गोधेगाव हत्याकांडातील फरार महिला आरोपी कोमल धर्मराज भिंगारदे हिला पोलिसांनी अटक केली.
आरोपीला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तालुक्यातील गोधेगाव शिवारात किरकोळ वादातून कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना २९ डिसेंबर २०२० रोजी घडली होती.
याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील पाचपैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर तीन जणांना जामीन नाही झालेला आहे.
दरम्यान, कोमल भिंगारदे ही पोलिसांच्या सापडत नव्हती. ती देवदर्शनाला आल्याचे समजल्याने पोलिस सब इन्स्पेक्टर राठोड यांनी देवगडला धाव घेतली.
पण तेथूनही त्या नगरकडे रवाना झाल्याचे समजले. यावर पोलिसांनी मागावर जात सुरेश नगर येथे कोमल भिंगारदे हिला जेरबंद केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम