अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- आरोपीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहारत 15 ऑगस्टच्या रात्री घडली होती. या मारहाणीत सादीक बिराजदार गंभीर जखमी झाला होता.
या घटना नंतर गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या पीडित तरुणाला पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केला होते माञ त्यानंतर त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या उपचारा दरम्यान आखेर त्याचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटने नंतर या प्रकरणात पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
तसेच शहरात हा मृत्यू नसून हत्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि १५ ऑगस्टच्या रात्री सादिक बिराजदार या तरूणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली होती.
त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना चार ते पाच जणांनी पोलिसांची गाडी थांबून सदिकला मारहाण करण्यात आली होती अशी फिर्याद पीडित तरुणाची पत्नी रुक्सार बिराजदारने भिंगार पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यांच्या या फिर्यादी वरून भिंगार पोलीस ठाण्यात मूनिया उर्फ अजीम रसूल सय्यद ,रशीद रसूल सय्यद ,कुद्दुस रशिद सय्यद, मोईन मुनिया उर्फ अजीम सय्यद ,
अर्शद मुनिया उर्फ अजीम सय्यद सर्व राहणारे दर्गादयरा मुकुंदनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रात्री रुक्सार सादीक बिराजदार यांच्या फिर्यादी वरून रात्री उशिरा वरिष्ठाच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम