अहमदनगर ब्रेकिंग : कार आणि बसच्या अपघातात नगरच्या एकाचा मृत्यू !

Published on -

Ahmednagar Breaking :- नगर-कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात कार आणि बस यांच्यात समोरासमोर धडक झल्याने भीषण अपघात झाला आहे

यात इको कारमधील गुलशन चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला असून गाडीतील मुलगा व चालक यासह दोन मुली असे चौघे गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले असून बस मधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे . ही घटना सोमवारी रात्री घडली

नगर-कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला राजुरीकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भयानक होता की कारचा चक्कचूर झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News