अहमदनगर ब्रेकिंग : मोबाईल खेळू नको म्हटल्याने तेरा वर्षाच्या मुलाची आत्महत्या !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  श्रीरामपूर शहरात बोरावके कॉलेज परिसरात असणाऱ्या इंदिरानगर भागात राहणारा एक तेरा वर्षीय मुलगा चिरंजीव आरुष याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्याची जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे.

साखर साखर कामगार रुग्णालयातील डॉक्टरांनी आरुषला उपचारापूर्वीच मयत असल्याचे घोषित केले.

या घटनेवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सारखा मोबाईल खेळू नको असे या मुलाला म्हटल्याने या मुलाने आत्महत्या केली आहे.काही दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या

रांजणखोल या गावांमध्ये देखील एका चौदा वर्षीय मुलाने वडील मोबाईल खेळतांना रागवले म्हणून अशीच गळफास घेऊन आत्महत्या केली होती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News