Ahmednagar Breaking : नातेवाईकाच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आणलेल्या तीन लाख 30 हजाराच्या रक्कमेची चोरी झाल्याची घटना आज दुपारी घडली. दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी रक्कम चोरून नेली.
तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये दुपारी एक ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सागर अनिल पवार (वय 30 रा. नेप्ती ता. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/01/11_12_2021-crime-news_22284820.jpg)
फिर्यादी यांचे नातेवाईक सुनील कांडेकर हे सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्यांचे ऑपरेशन असल्याने त्यासाठी लागणारी तीन लाख 30 हजाराची रक्कम घेऊन फिर्यादी शुक्रवारी दुपारी आले होते.
त्यांनी एक वाजेच्या सुमारास त्यांची मोपेड दुचाकी (एमएच 16 सीएम 3343) सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.
त्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये तीन लाख 30 हजाराची रक्कम होती. दुपारी एक ते अडीच यावेळेत चोरट्यांनी दुचाकी डिक्कीचे लॉक तोडून रक्कम चोरून नेली आहे.