अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंबी रोड परिसरात रविवार दिनांक 25 जुलै रोजी वीस वर्षे तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आंबे रोड परिसरात राहणारा अजय नंदू खैरे (वय-२०) याने आपल्या घराजवळ एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केले आहे
घटनेची माहिती समजताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी गर्दी करून मृतदेह खाली उतरला त्यानंतर साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेत मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला.
दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मयत अजयच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा मोठा परिवार आहे अजयच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम