अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-पाथर्डी शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने आपसातील तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा
अश्या दोन्ही गटातील ८ जन गंभीर जखमी झाले असून परस्पर विरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.
दोन गटात झालेल्या टोळी युद्धात मोठ्या प्रमाणावर गाड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शहरात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
सध्या लॉकडाउन असल्याने दुकाने बंद आहेत. मात्र, स्टॉल लावून दूध विक्री सुरू आहे. शहरालगतचे दूध विक्रेते शहरात येऊन चौकात दुचाकी वाहने उभी करून दूध विकतात. मंगळवारी रात्रीही अशीच विक्री सुरू होती.
तेव्हा शिरसाठवाडी येथील एका दूध विक्रेत्याला भिकनवाडा येथील एका दुचाकीचा धक्का लागला. त्यावरून वाद वाढत गेला. या दोन भागातील नागरिकांची यापूर्वीही अनेकदा भांडणे झाली आहेत.
त्यामुळे काही वेळातच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि हाणामारी तसेच दगडफेक झाली. यामध्ये वाहनांचेही मोठे नुकसान झाले.
पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन परस्पर विरोधी फिर्यादी दाखल असून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत वीस ते पंचवीस दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता तसेच अचानक झालेल्या
धुमचक्रीने नागरिकांची पळपळ झाली. घटना ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेटी दिल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम