अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत नेवासा बुद्रुक शिवारात सुरेश बाळासाहेब गारुळे यांच्या शेत गट नंबर ८८५ मधील ऊसाचे शेतात ऊसतोडणी चालू असताना अंदाज २०वर्ष वयाचा महिलेचे पूर्णपणे कुजलेले प्रेत मिळून आले.
सदरचे प्रेत हे अंदाजे १५ ते २० दिवसापूर्वीचे असून या बाबत नेवासा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या पायामध्ये पैंजण असून त्यावर राजेश्वरी असा मार्क असून हातात नारंगी रंगाचा प्लास्टिकचा बांगड्या आहेत.
नेवासा बु ।। प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यादव यांनी जागेवरच पोस्ट मोर्टम केले.सदर महिलेबाबत कोणास माहिती असल्यास नेवासा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी,असे आवाहन नेवासा पोलिसांनी केले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर हे करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|