अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ जिल्हा परिषद सदस्याचा घेतला कोरोनाने बळी!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. मागील पंधरा वर्षे जिल्हा परिषदेत नेतृत्व केलेले

तसेच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख म्हणून अनेक वर्ष एक कट्टर शिवसैनिक म्हणून तालुक्यात शिवसेनेची गाव तिथे शाखा उभारलेले मोहनराव जिवनाजी पालवे

यांचा काल रात्री पावणे दहा वाजता अहमदनगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे पाथर्डी तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून

मागील पंधरा दिवसापासून ते कोरोनाशी झुंज देत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील,

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर मोठी निष्ठा होती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून  यांनी राजकारणामध्ये एक मानाचे स्थान मिळवले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News